चाळीसगाव येथे RTO कार्यालय मंजूर

0
48

जळगाव – चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांचा प्रयत्नामुळे चाळीसगाव येथे ‘आरटीओ कार्यालय’ उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जळगाव ते चाळीसगाव हे अंतर फार जास्त असल्यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यास सोयीस्कर नव्हते. त्यामुळे चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय व्हावे अशी, मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. ही मागणी लक्षात घेता आमदार मंगेश चव्हाण यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरवठा करून चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय उभारण्यास मंजूरी मिळवली आहे.

Spread the love