रशियाच्या सैनिकांवर श्वानांचे मांस खाण्याची वेळ

0
13

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक ध्वनिफित समोर आली असून यात रशियाच्या सैनिकांनी श्वानाचे मांस खाल्ल्याचे कबूल केले आहे. एका इंटरसेप्टेड ऑडिओमुळे ही बाब समोर आली आहे. तसेच काही रशियन सैनिकांनी एका मुलीवर बलात्कार केल्याचेही या ऑडिओतून स्पष्ट झाले आहे.

कीव्ह सिक्रेट सर्व्हिसने 30 मार्च रोजी टेप फोन कॉल्स जारी केले. यात फोन कॉल्सदरम्यान रशियाच्या सैनिकांनी अन्नपुरवठय़ावरून तक्रारी केल्याचे समोर आले आहे.

या ऑडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती रशियाच्या सैनिकाशी बोलत असल्याचे ऐकू येते. ‘तुला चांगले अन्न मिळत आहे का’ असे या व्यक्तीने विचारल्यावर सैनिकाने ‘आम्ही काल एक श्वान खाल्ला होता’ असे उत्तर दिले. तुम्ही श्वान का अन्य काही खाल्ले आहे असे कुटुंबीयाने पुन्हा विचारल्यावर सैनिकाने ‘आम्ही काल एक श्वान खाल्ला, आम्हाला काही मांस हवे होते’ असे सांगितले. ऑडिओनुसार रशियाचे सैनिक निकृष्ट अन्नावरून त्रस्त झाले आहेत.

या टेप कॉलमध्ये सैनिकाने आपल्या सहकाऱयांनी एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचेही सांगितले आहे. या ऑडिओमध्ये एक महिला सैनिकाला हे कुणी केले असे विचारते. ही महिला कदाचित या सैनिकाची आई असावी. यावर सैनिकाने ‘माझ्या युनिटमध्ये सामील 3 ‘टँकर्स’नी हा बलात्कार केल्याचे उत्तर दिले. परंतु ही मुलगी कुठे राहणारी होती ही माहिती समोर आलेली नाही. या फोन कॉल युक्रेनच्या कुठल्या ठिकाणचा होता हे देखील स्पष्ट झालेले नाही. या फोन कॉलला एसबीयूने ट्विट केले आहे.

Spread the love