अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळाल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळल्याबद्दल आणि हल्ल्याबद्दलही राणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
“सैफ अली खानवर खरोखरच चाकूने वार करण्यात आला होता की तो फक्त अभिनय होता?” सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळल्यानंतर तो असा टुण टुण टुण करुन नाचतंय आलं, असं राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरीवरही प्रश्न उपस्थित केले.
राणे म्हणाले की, “बघा ते बांगलादेशशी काय करतायत त्या मुंबईमध्ये. त्या सैफ अली खानच्या घरात घुसले. किती नालायकपणा आहे, पुर्वी हे लोक फक्त नाक्यावर उभे राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहेत, कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, ये घाण लेके जाओ हमारे साथ” असं विधान राणे यांनी केलं आहे.
https://x.com/ANI/status/1882271388486287712?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1882271388486287712%7Ctwgr%5E6bdbb54922ac6546875618f5135557c9c4c19f04%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
हिंदू कलाकारांविरुद्ध भेदभावाचे आरोप
सैफ अली खान आणि शाहरुख खान सारख्या अभिनेत्यांबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर राणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “या मुद्द्यांवर जेव्हा जेव्हा कोणतीही घटना घडते तेव्हा सगळेच बोलतात. पण जेव्हा सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू कलाकाराला त्रास दिला जातो तेव्हा कोणीही पुढे येत नाही.”
राणेंनी नेत्यांवर निशाणा साधला
राणे यांनी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांसारख्या नेत्यांनाही लक्ष्य केले. या नेत्यांना फक्त सैफ अली खान, शाहरुख खान आणि नवाब मलिक सारख्या लोकांची काळजी आहे. राणे प्रश्न उपउपस्थित करत म्हटलं की, “कोणत्याही हिंदू कलाकाराची काळजी घेतली गेली आहे का?”
16 जानेवारीला सैफवर झाला होता हल्ला
16 जानेवारीच्या मध्य रात्री एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने सपासाप 6 वार करत त्याला गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर सैफला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. आता सैफची प्रकृती ठीक असून काल त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.