यावल – तालुक्यातील सातोद येथे विकास विद्यालयात झालेल्या तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धा घेण्यात आली यात तालुक्यातील साकळी येथिल अंजुमने इस्लाम उर्दु शाळेने दिनांक :- 16/09/2023 रोजी तालुका स्तरीय कब्बड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवले आहे.
विकास विद्यालय सतोद येथे झालेल्या वय वर्ष 14 व वय वर्ष 19 च्या आतील या दोन्ही कबड्डी स्पर्धेत साकळी येथिल अंजुमने इस्लाम उर्दु शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग सहभाग घेतला होता त्यात 14 वर्ष आतील अंतिम फेरीत मारूळ येथिल एग्लो उर्दु व साकळी येथिल अंजुमने इस्लाम उर्दु शाळेतील विद्यार्थी यांच्यात सामना झाला असता सामन्यात साकळी येथिल अंजुमने इस्लाम उर्दु शाळेने यश संपादन करून जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यात त्यांची निवड करण्यात आली तसेच 19 वर्ष आतील गट मध्ये सांगवी येथिल ज्योती विद्या मंदिर सांगवी व अंजुमने इस्लाम उर्दु शाळा त्यांच्या मध्ये सामना झाला या सामन्यात ही अंजुमने इस्लाम उर्दु शाळेने यश मिळविले या यशा बद्दल अंजुमने इस्लाम उर्दु शाळेचे संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद,मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थी वर्गाचे शाळेचे नाव लौकिक केल्याने कौतुक केले तर यशासाठी विद्यार्थ्यांना अशफाक सर, फैसल सर मुख्याध्यापक इरफान खान यांनी मार्गदर्शन केले.