प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील साकेगाव शिवारात गट क्र. ३१८ ब मधील निलेश अनिल झोपे यांच्या नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील विहीरीत एका अनोळखी अंदाजे ४५ ते ५० वय असलेल्या पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह दि.४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आढळला आहे.या बाबत निलेश झोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची अमृरनं १०/२०२६ नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे तपास करीत आहेत. मयताचे टक्कल पडलेले असून उजव्या हाताला मनगटावर कडे तसेच ॐ गोंदवले आहे. या बाबत माहिती मिळाल्यास भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








