दिपक नेवे
समस्त आदिवासी तडवी – भिल्ल समाज साकळी यांच्या वतीने दि.९ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सभागृहात जागतिक आदिवासी गौरव दिना विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तसेच नुकतेच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान प्रविण पारीस्कर तसेच गावातील मान्यवरांचा विशेष सत्कार या नुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सेवानिवृत्त जवान प्रविण पारीस्कर यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्या हस्ते गावातील महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यानंतर ग्रामपंचायत सभागृहातील कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त जवान प्रवीण पारीस्कर, यावल कृउबाचे माजी संचालक विलास नाना पाटील, उपसरपंच वसीम खान, वढोद्याचे सरपंच संदीप भैया सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते युनूससेठ पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, दिनकर माळी, खतीब तडवी, रईसखान कुरेशी, सय्यद अशपाक सय्यद शौकत, शरद बिऱ्हाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सै. अहमद सै. मिरा, दीपक पाटील, सर्फराज तडवी, नबाब तडवी, शिरसाडचे प्रमोद सोनवणे,साकळीचे ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांचेसह किसन महाजन, नितीन फन्नाटे जुम्मादादा तडवी, सलीम तडवी यांचेसह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले. तथापि अख्तर हैदर तडवी या युवकाने आदिवासी समाजाचे विशेष महत्त्व आपल्या मनोगतात मांडले हे या आजच्या आदिवासी गौरव दिनाचे विशेष होते.आजच्या आदिवासी दिनी महापुरुषांच्याच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवांची स्मरण केल्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो. गावात प्रत्येक समाजाची एकमेकात साखळी गुंतलेली आहे विशेष आहे.त्यामुळे सर्वांकडून गावाचा एकोपा कायम ठेवला जावा अशी अपेक्षा अध्यक्षीय भाषणात जि.प. सभापती रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली तर सामाजिक कार्यकर्ते युनुसशेठ आपल्या मनोगतात म्हणाले की, देशाच्या प्रगतीत आदिवासींचे योगदान फार महत्वाचे आहे. भारतातील एकता ही महान असून देशाची संस्कृती टिकून राहण्यासाठी आदिवासींचे सुद्धा योगदान आहे. आपल्या सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त जवान प्रवीण पारीस्कर म्हणाले की, गावाने मला आजपर्यंत जो मानसन्मान दिलेला आहे ती माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. माझ्यासाठी माझी मातृभूमी सर्वात अगोदर महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे गावातील तरुणांच्या मनात भारतीय सैन्यात जाण्यासाठी व त्यांच्या हातून देश सेवा होण्यासाठी मी त्यांना यापुढे सदैव प्रोत्साहित व मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमास गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी.खान तर आभार प्रदर्शन समीर तडवी यांनी केले