दिपक नेवे
साकळी महसूल विभागाच्या ‘ माझी शेती,माझा सातबारा ‘या व्यापक अभियानाअंतर्गत
मीच नोंदविणार माझा पिकपेरा
शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील पिकपेरा ई-पीक पाहणी अॅप माध्यमातून नोंदवता येणार आहे ही माहिती देण्यासाठीसंबंधित ई-पीक पाहणी उपक्रमाची माहिती देण्यासाठी साकळी ता.यावल येथे साकळीचे मंडळ अधिकारी पी.ए.कडनोर यांनी शेतकऱ्यांना दि.१५ ऑगस्ट रोजी कॉर्नर सभा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी तलाठी व्ही.एच. वानखेडे, कोतवाल गणेश महाजन हजर होते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरणाच्या क्रांतीचे सर्व शेतकरी साक्षीदार बनणार आहे त्यासाठी संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांसाठी लिंक देण्यात आलेली असून ती लिंक वापरून शेतकऱ्यांना आपला पिक पेरा नोंदवता येणार आहे.
या लिंक वरील माहिती थेट ७/१२ वर जाणार असल्याने शेतात जागेवरून आपल्या पिकाचा फोटो अपलोड करावा तसेच चुकीची पिकपाहणी अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी दि.१५ ऑगस्ट ते १५ संप्टेबर एक महिन्यादरम्यान हे अभियान सुरू राहणार आहे
यावेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते त्याचप्रमाणे या ई-पीक पाहणी दरम्यान काहीही अडचण आल्यास आपल्या गावाचे तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.