साकळी येथे मंत्री ना.यशोमती ठाकूर यांचा सत्कार 

0
21

दिपक नेवे

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमती ठाकूर यांचा नुकताच फैजपूर दौरा होऊन गेला यादरम्यान त्यांनी फैजपूर येथून वढोदा येथील कार्यक्रमाला हजेरी लावली त्यानंतर ते चोपड्याकडे जातांना त्यांचा साकळी येथील बसस्थानकावर सत्कार करण्यात आला व जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच किरण महाजन, सामाजिक कार्यकर्ते युनूसशेठ पिंजारी, सचिन चौधरी, ग्रा.पं. सदस्य सै.अश्पाक सै.शौकत, सौ.नीलिमा नेवे, रबाना तडवी, सतीश चौधरी, गजानन सोनार, वसिमभाई,सलिम तडवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जि.प.चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. या सत्काराच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Spread the love