दिपक नेवे यावल
साकळी -येथे गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाचा हौदोस सुरू असून गावात गायीच्या व इतर ढोरांच्या शेपटी पकडून चावा घेत आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे भेदरलेली ढोरे रस्त्याने सैरावैरा पळत असतात यामुळे या पळणाऱ्या ढोरांमध्ये कोणी आल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी या माकडाचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
याबाबत माहिती असे की, गावात गेल्या अनेक दिवसापासून एका पिसाळलेल्या माकडाने थैमान घातलेले असून या माकडाने गावात अक्षरशः होदोस मांडला आहे. हे माकड गावात ज्या भागात जाईल त्या भागातील गुरा-ढोरांच्या मागे लागून त्यांना बोचकणे आहे व चावाही घेत आहे त्यामुळे हे ढोरे गंभीरपणे जखमी होत आहे. आणि जर या माकडाने एखाद्या मोकळ्या फिरत असलेल्या गाईवर अथवा गोऱ्यावर हल्ला चढविला तर ही ढोरे माकडाच्या भितीने दिसेल त्या रस्त्याने सैरावैरा पळतात या सैरावैरा पळत असलेल्या ढोरांच्या मध्ये कोणी लहान मुले,महिला, वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांचा जीव देऊ शकतो एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या माकडाच्या दहशतीमुळे गावातील नागरिक खूप धास्तावले आहे.गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शनी मंदिर भागातील वसंत काशिनाथ बडगुजर, पवन रवींद्र बडगुजर, श्रावण भिका बडगुजर, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, किशोर बडगुजर, बापू मराठे, भगवान बाबुराव बडगुजर या ग्रामस्थांच्या गुराढोरांवर विशेषतः बऱ्याच गाईंवर या माकडाने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे दरम्यान पंचायत समिती सदस्य दीपक अण्णा पाटील यांनीही यावल वन विभागाशी संपर्क साधून पिसाळलेल्या माकडाचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात सांगितले आहे.
जखमी झालेल्या सर्व गुरा-ढोरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज पाटील तसेच डॉ.वाय.जी.नेवे यांनी उपचार केले आहे. तुमच्या गावातून काही नागरिक व पदाधिकाऱ्यांनी या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठीची मागणी केलेली आहे त्यानुसार या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आज दि.१४ रोजी कर्मचाऱ्यांना साकळी येथे पाठवतो. असे यावल वनविभागाचे अधिकारी विशाल कुटे यांनी सांगितले.