दिपक नेवे
महिला व बालकल्याण विभागाच्या संदर्भसेवा अंतर्गत साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज दि.२९ रोजी गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील तसेच गावातील सर्व अंगणवाडीच्या सॅम व मॅम म्हणजे कमी वजनाच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पावसाळा ऋतूतील जलजन्य व संसर्गजन्य आजारांचा कमी वजनाच्या मुलांना अधिक धोका असतो.त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली आहे .तसेच त्यांच्या वैयक्तिक स्वच्छता व आहार याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे सध्या जे विद्यार्थी आजारी आहे.त्यांच्यावर योग्य असे उपचार करण्यात आले व औषधे दोयात आली. त्याचप्रमाणे आज पासून प्रा.आ.केंद्राच्या सहकार्यातून साकळी बीटच्या गावातील संपूर्ण अंगणवाड्या मधील विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असून वजन घेतले जाणार आहे. जे आजारी बालक असतील त्यांच्यावर वेळीच योग्य असे उपचार केले जाणार आहे. तसेच या बालकांच्या आहाराविषयी पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.सदर आरोग्य तपासणी साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी केली तर स्वच्छता व आहाराविषयी अंगणवाडी सेविका सौ.मंगला नेवे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यात नुकतीच कुपोषित बालक दगावण्याची दुदैवी घटना घडल्यामुळे बालकांची काळजी म्हणून गावातील बालकांची आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.बालक आरोग्य तपासणीच्या वेळेला आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी हजर होते