दिपक नेवे
साकळी येथे श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय संस्था व समस्त माळी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२६ वी पुण्यतिथी दि.८ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. पुण्यतिथी सोहळाच्या निमित्ताने गावातील श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात सकाळी माळी समाजातील नवदाम्पत्याच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे उपस्थित समाजबांधवांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन महाराजांच्या चरणी अभिवादन करण्यात आले. यानंतर पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात माळी समाजातील यंदाच्यावर्षी इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान प्रविण परिस्कर यांचा तसेच श्री भवानी माता बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी संजय छगन पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे माळी महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी संतोष सुरेश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य वसंतराव महाजन,जि. प.शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील,माजी उपसरपंच किरण महाजन, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वामन माळी, प्रगतिशील शेतकरी श्यामकांत महाजन हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजअध्यक्ष सुभाष महाजन यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू माळी (सर) यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष दिनकर माळी, सचिव-भोजराज महाजन, सदस्य- अंबादास बोरसे,सुरेश चौधरी,राजू माळी(सर), सुभाष पाटील, अशोक माळी, कृष्णा बोरसे, सुरेश महाजन, रवींद्र माळी, दिलीप माळी, दिनेश माळी, भिका बोरसे, संजय चौधरी यांचेसह समस्त माळी समाज बांधवांनी सहकार्य केले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात करण्यात आले.सदर कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात व कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.