दिपक नेवे
यावल -साकळी येथील ग्रा.पं.सदस्य सै.अश्फाक सै.शौकत व सामाजिक कार्यकर्ते फैसल खान तसेच त्यांच्या मित्रपरिवारातर्फे सर्व समाजातील विविध घटकातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दि.२० रोजी माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यावल येथील सामाजिक कार्यकर्ते अझहर भाई व शाहरुख भाई यांनी केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी अशा विविध शासनाच्या योजनांची माहिती दिली व सखोल मार्गदर्शन केले. यात मजूर कामगार योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जिवनदायी योजना, हजरत बेगम महल मुलींसाठी स्कॉलरशिप योजना,ई-श्रम मजूर राष्ट्रीय योजना,मातृवंदना गर्भवती महिला योजना, नविन मतदान नोंदणी,मौलाना आझाद अल्पसंख्यांक स्कॉलरशिप योजना यासह अनेक शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा साकळी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील सामाजिक कार्यकर्ते फैसल खान शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष महाजन यांचे सह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम पिक संरक्षण सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता. सर्वसामान्य मजुर वर्गासाठी असलेली ई -श्रम मधुर राष्ट्रीय योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पाच लाखांचा विमाकवच असून या योजनेत अजून विविध असे लाभ मिळणार आहे.तरी लाभार्थ्यांनी ई-श्रम योजनेचे कार्ड काढून घ्यावे. प्रत्येक जण आपल्या धकाधकीच्या जीवनात जगत असतांना शासनाच्या कोणकोणत्या योजना आहे याकडे लक्ष देत नाही मात्र आपले जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, मजूर, कामगार,महिला, विद्यार्थी या सर्वांनी आपले आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून शासनाचा योजनांचा निश्चितपणे लाभ घ्यावा. सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करून योजना पोहोचविण्याचे आमचे ध्येय असून त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातील. असे अझहरभाई यांनी आपल्या मार्गदर्शना सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्पाक सय्यद शौकत यांची सामाजिक संवेदना सर्वांनाच जाणवली. त्यांनी आपल्या पदाचा दृष्टीने व्यासपीठावर बसायला पाहीजे होते.मात्र त्यांनी व्यासपीठावर समोर न बसता उपस्थित नागरिकांमध्ये बसणे पसंत केले कारण उपस्थितांमध्ये सय्यद अशपाक यांच्यापेक्षाही वयाने व मानाने काही मोठे नागरिकही बसले होते ही बाब लक्षात घेता ते संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत खालीच बसले होते ही जिव्हाळ्याची बाब प्रकर्षाने जाणवत होती
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मजूर, कामगार, विद्यार्थी व विविध स्तरातील ग्रामस्थ,युवक उपस्थित होते.
दि.२१ पासून पुढील तीन दिवस सदर सभागृहातच विविध शासन योजनांचा लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यांना योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शिबिरात ठिकाणी यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.












