साकळी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी 

0
55

दिपक नेवे

यावल -साकळी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत शाखा साकळी व नाभिक समाज बांधवांच्यावतीने दि.४ रोजी संत श्रेष्ठ श्री सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले चौकातील संत सेना महाराज प्रतिमेचे व फलकाचे पूजन माजी जि.प.सदस्य वसंतराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी, जयंत बोरसे यांचेसह समाज बांधव उपस्थित होते तर दुसऱ्या कार्यक्रमात जळगाव जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील ,रामकृष्ण खेवलकर यांचेसह सर्व समाज बांधव उपस्थित होते. तसेच सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते नाभिक महामंडळाच्या साकळी शाखेचे नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नाभिक महामंडळाचे साकळी शाखाप्रमुख संजय चित्ते, उपाध्यक्ष घनःश्याम सूर्यवंशी, खजिनदार रोहिदास चौधरी, सचिव आकाश चित्ते तसेच सदस्य सतीश चौधरी, मधुकर चित्ते,सचिन सपकार, घनःश्याम झुरकाळे, राजू सोनवणे, ज्ञानेश्वर चित्ते यांचेसह ज्येष्ठ समाज बांधव वासुदेव न्हावी यांचेसह सर्व समाज बांधव उपस्थित होते.यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Spread the love