साकळी येथे श्याम महाजन मित्र परिवाराने….  स्वखर्चातून केला बस स्टॅन्ड रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्याचा निचरा ! 

0
51

दिपक नेवे

यावल -साकळी येथील गाव ते बस स्टॅन्ड या मुख्य रस्त्यालगतच्या गटारीतून पाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने पावसाचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात तुंबत असते. त्यात तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना खूप मोठा जीवघेणा त्रास सहन करावा लागत असतो. नेहमी तुंबत असलेल्या पाण्याने रस्त्यांची पुरती वाट लागलेली असून रस्त्यात मोठ- मोठे खड्डे ही पडलेली आहे तेव्हा ‘वाहनधारकांनो…!जीव मुठीत घेऊनच प्रवास करा ‘ असा संदेशच जणू हा खड्डेमय रस्ता देत आहे एवढी ‘ बिकटवाट ‘ या रस्त्याची बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर रस्त्यावरील पावसाच्या तुंबलेल्या पाण्याचा सुरळीतपणे निचरा व्हावा व वापरणाऱ्या नागरिकांची काही प्रमाणात दिलासा मिळावा या भावनेने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून साकळी येथील श्यामभाऊ महाजन मित्रपरिवाराने दि ५ रोजी स्वखर्चाने जेसीबी लावून तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी श्यामभाऊ महाजन, ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्पाक सय्यद शौकत, जगदीश मराठे, शिवसेनेचे संतोष महाजन, प्रवीण माळी,जयंत बोरसे, दिनेश माळी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे, राहूल सोनार, पप्पू माळी, सतिष न्हावी, बिस्मिल्ला तडवी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. श्यामभाऊ महाजन मित्रपरिवाराने पोळाच्या आदल्या दिवशी सदर समाजहिताचा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्यामभाऊ महाजन मित्रपरिवार वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्य करीत असतात व समाजाच्या कौतुकास पात्र ठरतात

दरम्यान, या रस्त्यावरील खोलगट खड्डे पाहता या खड्ड्यांमुळे कुण्या वाहनधारकांचा कधी जीव जाऊ शकतो एवढी खराब परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झालेली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का ? ते कुणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? असले संतप्त प्रश्न या ठिकाणी नागरिक उपस्थित करीत होते. तरी या रस्त्याबाबत श्याम भाऊ महाजन मित्र परिवाराकडून संबंधितांना लेखी निवेदन दिले जाणार आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी सहकार्यासमवेत खड्ड्यात बसून आंदोलन केले होते शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाने मलमपट्टी करून आंदोलन कर्त्यांना लेखी आश्वासन दिले रस्त्याचे तात्पुरता कामही केले नाही. शेवटी शामभाऊ महाजन मित्र परिवार कडून स्वखर्चाने रस्त्यावरील तुंबालेल्या पाण्याचा निचरा करावा लागला ही एक प्रशासनासाठी खेदाची बाब आहे .

Spread the love