साकळी येथे जि प उर्दू शाळेत लसीकरण

0
40

दिपक नेवे

यावल -शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘ हर घर दस्तक ‘ या मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले व डॉ.मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायत कार्यालय ,जि.प.शाळा या ठिकाणी लसीकरणाचे शिबिर आयोजित केले जात आहे.या शिबिराचा गावातील नागरिक मोठया संख्येने लाभ घेत आहे. दरम्यान साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दि.२६ लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील,ग्रा.पं. सदस्य सय्यद अश्फाक सय्यद शौकत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नितीन फन्नाटे यांनी भेट दिली व शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. या शिबिरामुळे शाळा परिसरातील रहिवाशी नागरिकांना फायदा होणार आहे.

Spread the love