यावल प्रतिनिधि
यावल : दि. १७ तालुक्यातील साकळी येथील राहत्या घरात एका तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज दि.१७ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आले . आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही . मोहम्मद इसा तडवी ( वय २१ ) रा .साकळी असे मयत तरुणाचे नाव असून सदर घडलेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर माहिती अशी की, मोहम्मद तडवी हा आई,वडील, दोन भाऊ यांच्या सह साकळी येथील इंदिरा नगर भागात वास्तव्याला आहे . आई,वडिल तसेच लहान दोघ भाऊ यांच्यासह मोहम्मद हा मजुरी करून घरातील चूल पेटवण्या साठी मदत करत होता. दि.१७ फेबुवारी वार गुरुवार रोजी आई,वडिल,भाऊ हे सर्वजण मोल मजुरीच्या कामाला गेले असतांना मोहम्मदने आपल्या घरात साडी गळ्याला बांधून घराच्या छताच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती. दुपारच्या सुमारास साडेतीन वाजेच्या सुमारास लहाण भाऊ हमीद हा जेवणासाठी घरी आल्यावर त्याने मोठा भाऊ मोहम्मद हा घरात लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले व आजु बाजूला आरडाओरड करून लोकांना बोलविले असता लोकांनी बघितले असता तो मृत असल्याचे निर्दशनास आले. या घटनेची माहिती मिळताच यावल पो.स्टे. पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून अस्कमात मृत्युची नोंद करून शवविच्छेदना साठी शव ग्रामीण रुग्णालय यावल येथे पाठविले आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहे.