साकळी येथील जय दुर्गा मित्र मंडळ आयोजित विविध स्पर्धांना सुरुवात !

0
41

दिपक नेवे

साकळी – येथील बाजारपेठ भागातील जय दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेसह पुढील काही दिवस होणाऱ्या विविध स्पर्धांचे उद्घाटन आज दि.९ रोजी माजी ग्रा.पं.सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व युवा कार्यकर्ते दिपक नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते कॅनव्हासवर प्रत्यक्ष चित्र रंगवून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साकळी विकासाचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुनील नेवे, माजी ग्रा.प.सदस्या सौ.मनीषा नेवे, विहिंपचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, मंडळाचे अध्यक्ष निलेश चित्रे, प्रगतिशील शेतकरी भूषण नेवे हे उपस्थित होते.स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात अतिशय रंगतदार व लक्षवेधी झाल्याने स्पर्धक व उपस्थित पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.कार्यक्रमा ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आले.

चित्रकला स्पर्धेमध्ये विविध गटातून जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.त्याचप्रमाणे या उत्सवादरम्यान ‘ घरीच काढूया सुंदर रांगोळी ! ‘ या अंतर्गत निसर्ग चित्र या विषयावर सर्व गटांसाठी पोस्टर रांगोळी स्पर्धा, घट सजावट स्पर्धा यासह लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, गाढवाला शेपुट लावणे, बादलीत चेंडू टाकणे, लिंबू चमचा यासह तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या गेल्या. सर्व स्पर्धांना महिला,युवक- युवती तसेच सर्व वयोगटातील मुले यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत जवळपास २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश नेवे यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत नेवे त्यांनी केले. कार्यक्रमास मंडळाचे सर्व कार्यकर्ते-पदाधिकारी हजर होते.

Spread the love