दिपक नेवे
साकळीगाव ते साकळी फाटा या रस्त्याचे विशेष निधीतून नुतनिकरण करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. तरी सदर रस्त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यानुसार सविस्तर असे की, साकळीगाव ते साकळी फाटा(बसस्टॅड) हा रस्ता सकाळी गावातून जातो या रस्त्यावरून वापरणारे साकळी हे परिसरातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असुन या गावस लागुन १० खेडेगाव आहे.साकळीसह सर्व खेडे यांचा मुख्य वापराचा सदर हा रस्ता असुन या रस्त्यावरून बाराही महिने मोठया प्रमाणात वर्दळ असते.सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्या कक्षेत येतो दरम्यान काळात गेल्या काही वर्षापासुन रस्त्याच्या नुतनिकरणाबाबत काम झालेले नसल्याने भर रस्त्यात अडीच ते तीन फुट पावसाचे पाणी तुबंते. रस्त्यात जिवघेणे खडडे पडणे, चिखल होणे अश्या अडचणी निर्माण झालेल्या आहे.त्यामुळे सदर रस्ता नागरिकांच्या मुख्यतः महिलावर्ग लहान मुले शाळेत जा- ये करणारे विदयार्थी यांच्या वापरासाठी हा रस्ता अतिशय धोकेदायक च जिवघेणा बनला आहे.सदर रस्त्याच्या कामासाठी तात्कालीन जि.प.सदस्या विदयाताई महाजन व तात्कालीन पं.स. उपसभापती भास्कर नायडे यांनी या अगोदर उपोषण केलेले होते.तेव्हा संबधित विभागाने रस्त्याचे काम केले होते. मात्र आता भर रस्त्यात पावसाचे पाणी तुबंत असल्याने रस्त्याची समस्या पुन्हा जैसे थे बनली आहे. तरी सदर रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी व नागरिकांना वापरासाठी चांगला रस्ता उपलब्ध व्हावा या मागणीसाठी मिलिंद जंजाळे यांनी दि. ३० जून२०२१ रोजी रस्त्यातील खडुयात बसून तीव्र
आदोलंन केले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (यावल) अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन तात्पुरती दुरुस्ती करून देत त्यानंतर निधी प्राप्त झाल्यानंतर नुतनिकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.मात्र संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर भाजपाचे काही स्थानिक पदाधिकारी दबाव आणन रस्त्याच्या कामात खोळंबा आणु शकतात.तरी मुख्यमंत्री साहेब सदर रस्त्याच्या समस्येचे गांर्भीर्य ओळखुन साकळी गाव ते साकळी फाटा (बस स्टैंड पर्वत) त्याची आपल्या विशेष शिफारसीतून व निधीतून तात्काळ नुतनिकरण करण्यात यावा.अशी मागणी पत्रात शेवटी करण्यात आलेली आहे.सदर पत्र दि.७ जुलै ०२१रोजी पाठविण्यात आलेले आहे.