दिपक नेवे
साकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा अंतर्गत नवीन शाळा व्यवस्थापन समिती पालक सभेमधून सर्वानुमते गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी संतोष सुरेश महाजन यांची तर उपाध्यक्षपदी सलिमा बिस्मिल्ला तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारिणीतील सदस्य म्हणून मदिना अरमान तडवी, कैलास तुळशीराम महाजन, किसन सुखदेव भोई, सौ.दिपाली विनोद माळी, पिंटू सुभान तडवी, सौ पूजा संतोष माळी, भागवत रामा बिऱ्हाडे, सौ.लक्ष्मी राहुल जंजाळे, अल्लाउद्दीन इक्रामोद्दीन, सौ.शरीफा विनोद तडवी, नितीन रमेश फन्नाटे(शिक्षणप्रेमी सदस्य),मुख्याध्यापक किशोर साळुंखे सर (सचिव) यानुसार निवड करण्यात आलेली आहे.नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी शाळेच्या वतीने दि.७ रोजी पालक- शिक्षक सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी व्यासपीठावर मागील समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण तेली,उपाध्यक्ष सौ.भारती महाजन यांचेसह कार्यकारणी सदस्य तसेच मुख्याध्यापक किशोर साळुंखे (सर) उपस्थित होते. या सभेत माता-पिता पालक उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंखे (सर)यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन समाधान कोळी (सर)
यांनी केले नव्याने निवड करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शासनाच्या कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक अश्या सर्व नियमांचे सभेच्या ठिकाणी पालन करण्यात आले.