दिपक नेवे
साकळी येथील जि.प.प्राथमिक मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिनेश जगन्नाथ माळी तर उपाध्यक्षपदी सौ.शबाना अकील तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच सदस्यपदी सौ.शशिकला मनोहर महाजन, हर्षल सुभाष बाविस्कर,विजय निंबा बाविस्कर, शंकर आनंदा जंजाळे,रशीदा तडवी,सुमान गंमीर तडवी,सौ.भाग्यश्री ईश्वर कुंभार,सौ.सविता पंकज भोई यांची निवड करण्यात आलेली आहे तर सौ.शितल नितीन बडगुजर
(शिक्षणतज्ञ सदस्या)
सौ मंगला बाबुलाल सपकाळे
(सचिव),सचिन धालपे
(शिक्षक प्रतिनिधी सदस्य) या नुसार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.दि.६ रोजी सदर शाळेत पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी मागील शाळासमिती अध्यक्ष संजय बोरसे हे होते तर व्यासपिठावर शिक्षणप्रेमी सदस्य बापूराव महाजन,मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे,सदस्य हर्षल बाविस्कर,विजय बाविस्कर,वनिता माळी,पालक योगराज बाविस्कर उपस्थित होते.सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व अतिशय काटेकोर नियोजनात पार पडली.सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मंगला सपकाळे यांनी केले.या वेळी पुरुष व महिला पालक,शिक्षक उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेकडून स्वागत करण्यात आले.पालक सभेचे सूत्रसंचालन शिक्षक सचिन ढालपे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ.एस.ए.वाडीले यांनी केले.