दिपक नेवे
साकळी येथील अंगणवाडीत बालकाचा वाढदिवस योजने अंतर्गत संदर्भ सेवा उपक्रम म्हणून लाभार्थी लहान बालकांचा वाढदिवस साजरा केला जातो. या उपक्रमाचा भाग म्हणून दि.१२ रोजी साकळी येथील अंगणवाडी क्र.१० मध्ये चि.संयोग मनोज बिऱ्हाडे (वय ६महिने) या लहान बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला. यात या बालकाला त्याच्या मातेसह शाळेत बोलवून त्याचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाळाला आईच्या कुशीत बसवून त्याच्यासमोर रंगीत फुलांची रांगोळी काढण्यात आली होती व वाढदिवसाचा फलकही रंगवण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त या बाळाला औक्षण करण्यात आले. गोड शिरा खायला दिला सदर उपक्रमा- अंतर्गत सदर अंगणवाडी शाळेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी बालकांचा वाढदिवस या अंगणवाडी वेळोवेळी साजरा केला जात असतो. सदर उपक्रमामुळे लाभार्थी बालकाचे कुटुंबीय भारावून गेले होते.या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका सौ मंगला नेवे,मदतनीस काशीबाई माळी यांनी संकल्पना राबविली यावेळ महिला ग्रामंस्थ उपस्थित होत्या.सदर उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.