साकळी येथील विशेष ग्रामसभेत नवमतदारांची केली नोंदणी

0
47

दिपक नेवे

यावल -निवडणूक यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन(साकळी) यांच्या संयुक्त विद्यमाने दि १६ रोजी साकळी ता.यावल येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी होते. तसेच सभेस साकळीचे तलाठी व्हि.एच. वानखेडे,प्र.ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी, ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्फाक सय्यद शौकत, जगदीश मराठे, वरिष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी, कोतवाल गणेश महाजन यांचे सह गावातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी(बीएलओ) तसेच नागरिक,नवमतदार तरुण-तरुणी नागरिक उपस्थित होते.या सभेचे कामकाज साकळीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांनी केले.तसेच सभेत बुथ निहाय सर्व मतदार याद्यांचे वाचन केले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.त्याचप्रमाणे नवमतदारांचे मतदान यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, नाव कमी करायचे असल्यास कमी करणे,

दुरुस्ती करणे व त्यासंबंधी कामे मतदान यादीनिहाय करता येणार आहे. तरी नवमतदार नोंदणी विशेष अभियाना अंतर्गत ज्या नवमतदारांना आपले नाव नोंदायचे असल्यास त्यांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन संबंधित निवडणूक यंत्रणेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Spread the love