समाजाच्या प्रत्येक घराघरात टोकरेकोळी (एसटी) चे दाखले पोहोचविणार

0
12

अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांची संकल्प.

चोपडा – अमळनेर उपविभागीय प्रांत कार्यालय अंतर्गत चोपडा व अमळनेर तालुक्यातील कोळी समाजाच्या प्रत्येक गावातील घराघरात टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र पोहोचविणार असल्याचा संकल्प अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते व महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.

नुकतेच अमळनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोळी लोकांना सुलभ पद्धतीने टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी आपल्या परिवारातील सर्व सदस्यांसह शेकडों समाज बांधवांना सोबत घेऊन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहात सर्व राजकीय आजीमाजी लोकप्रतिनिधी, सामा. संघटनांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, तरुण कार्यकर्ते, महिलामंडळ, आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागही नोंदविला होता. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी कैलास कडलग यांनी पाचव्या दिवशी सत्याग्रहींच्या प्रमुख मागण्या मान्य करून टोकरेकोळी चे जातप्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केल्याने आज अखेर दोन्ही तालुक्यातील शेकडों (३०३) लोकांना दाखले मिळाले असून अजूनही शेकडोंचे दाखले तयार करण्याचे काम सुरू आहे, अशीही माहिती जगन्नाथ बाविस्कर यांनी दिलेली आहे. यासाठी चोपडा येथील जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर तसेच अमळनेर तालुका कोळी समाज मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे.

 जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

आदिवासी कोळी लोकांनी ३६,३६ अ च्या नोंदीसह योग्य ती कागदपत्रे जमवुन सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. पोहोचपावती सोबत ठेवावी. तसेच प्रांत कार्यालयात जाऊन गर्दी करू नये. जर कुणी चिरीमिरी मागत व सांगत असेल तर तसेही सांगावे. कारण आपण अन्नत्याग सत्याग्रह हा आत्मस्वाभिमानाने दाखले मिळविण्यासाठी केलेला आहे. हे ही समाजबांधवांनी लक्षात ठेवावे..

जगन्नाथ बाविस्कर, तालुका संपर्कप्रमुख, महर्षी वाल्मिकी समाज मंडळ, ता. चोपडा.

 

Spread the love