जळगाव -महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव च्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोज सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे जिल्हा निमंत्रक रणजीत सोनवणे, मनीषा देशमुख मनोज नन्नवरे या तिघ जिल्हा निमंत्रकांनी केलेल्या अवाहनाने १४ नोव्हेंबर रोजी रविवारी मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणा धिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण व शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे समता परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष आप्पासो भरतजी शिरसाठ प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांतजी गरुड राज्य सदस्य डी. एम. मोतीराय, कास्ट्राईबाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, वि.अध्यक्ष बी. एन. पाटील महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा छाया बैसाने, सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी कोळी, गणेश बच्छाव, भैय्या साहेब सोनवणे, यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला. जि. प. उच्च प्राथमिक शाळा शेरी ता. धरणगाव येथील उपशिक्षक शैलेश शिरसाठ यांची प्राथमिक विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांना प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांत गरुड यांच्या हस्ते निवड करण्यात येऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दलपरिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.












