संपूर्ण जिल्ह्यात लाल्याचा थैमान कापूस उत्पादकांना हेक्‍टरी 30 हजार रुपये मदत द्या रघुनाथ दादा प्रनित शेतकरी संघटनेची मागणी

0
62

हेमकांत गायकवाड

चोपडा: संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे कापूस या नगदी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले आहे आधी सुरुवातीला दोन महिने पावसाने हुलकावणी दिली जसं तसं करून शेतकऱ्यांनी कापसाला लहान मुलासारखे वागुन मोठं केलं एन फुलोरा स्थितीत असताना सततच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संकटात घेरलेलं आहे शेताची मशागत बियाणे खते कीटकनाशके व मजुरी या साऱ्यांच्या हिशोब केला तर शेतकऱ्यांनी आज जमिनीत करोडो रुपये ओतून दिले आहे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी शासनाने सरसकटपणे हेक्टरी ३०,०००/- रू. मदत जाहीर करावी असे निवेदन आज जिल्हाधिकारी साहेब यांना शेतकरी संघटनेने दिले यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर चोपडा तालुकाध्यक्ष सचिन शिंपी जळगाव ग्रामीण अध्यक्ष सय्यद देशमुख प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील नरेंद्र पाटील विनोद धनगर नामदेव महाजन संजय महाजन अखिलेश पाटील आदी पदाधिकारी हजर होते.

Spread the love