भोपाळ (सांची ) :- मध्यप्रदेशातील भोपाळ शहारा पासून जवळच असलेल्या सांची येथील ऐतिहासिक बौद्ध स्तूपात भरणारा ‘सांची महोत्सव’ इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडवितो, या स्तूपा मध्ये भगवान बुद्ध यांचे पट्टशिष्य ज्यांना गौतम बुध्द यांचे उजवे हात संबोधले जात होते अश्या सारीपूत्त तसेच महामोग्गलायन यांच्या पवित्र अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत त्या अस्थी या महोत्सवात जनतेच्या दर्शनार्थ ढेवल्या जातात त्यामुळे इथं जनता भक्तिभावाने लीन होतात देश विदेशातील बौद्ध भिक्खू इथं वर्षभर मोठ्यासंख्येने येत असतात. या स्तूपात बुद्ध जीवनातील विविध प्रसंग कोरण्यात आले आहेत तेंव्हा इतिहास , संस्कृतीच्या संरक्षणार्थ तसेच बुद्ध विचारधारेच्या प्रचार , प्रसार करण्या करीता अश्या महोत्सवाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. दिनांक १ डिसेंबर रोजी सांची येथील बौद्ध स्तूप परिसरात आयोजित ‘ सांची महोत्सवात ‘ सहभागी झालेल्या जळगाव येथील सारा फाऊंडेशन तर्फे आयोजित धम्म सहलितील जनतेस मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते. जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सांची येथील बौद्ध स्तूप हा सम्राट अशोक यांनी सुमारे २४०० वर्षां आधी उभारला आहे. सम्राट अशोक यांनी जेवढे स्तूप उभारले त्यापैकी सर्वात चांगल्या अवस्थेत राहिलेला हा स्तूप आजही आपणास पाहावयास मिळतो . इथली शिल्पकला , स्थापत्यकला अभ्यासकांना भुरळ घालत आहे. सांची येथील हा स्तूप १९८९ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे . जगात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण २४०० वर्षां नंतरही येवढ्या भक्कमपणे उभी असलेली दुसरी वास्तू दिसत नाही या वरून अशोक कालीन बांधकाम शैली, बांधकामात वापरावयाच्या विविध वस्तू अनाकलनीय वाटतात . या वरून त्याकाळी कारागिरांमध्ये कमालीचा प्रामाणिकपणा जसा दिसून येतो तसेच त्याकाळी अशोकाचे साम्राज्य अनेक क्षेत्रात भरभराटीला आलेले अत्यंत समृध्द असलेले साम्राज्य होते हे दिसून येते. जयसिंग वाघ यांनी सांची स्तूप, सांची येथील वास्तुसंग्रहालय तसेच सांची पासून जवळच असलेल्या विदिशा या ऐतिहासिक गावाबद्दल सुध्दा सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सी. यू. भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन विनोद सपकाळे यांनी केले. या प्रसंगी भारतीय इतिहास , संस्कृतीचे अभ्यासक सुभाष वाघ, बापू साळुंके, अरविंद बिऱ्हाडे, नथू अहिरे, गुलाब बाविस्कर, अशोक हनुवते यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सुरेखा भालेराव, विजयाताई शेजवळकर, कमल सोनावणे, सिंधुबाई तायडे, सुमनबाई बैसाण, माधुरी साळुंके आदी महिलांनी बुद्धगीतं सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
सुरवातीस त्रीसरण, पंचशिल ग्रहण करण्यात आले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्वांनी सारिपुत्त, महामोगल्यान यांच्या अस्थींचे भक्तिभावे दर्शन घेतले.