सांगवी खुर्द येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा जाहिर निषेध,,,,सर्व नराधमांना फाशी झालीच पाहिजे.:श्री,किशोर रमेश बाविस्कर, नगरसेवक सभापती व स्थायी समिती सदस्य .जळगांव मनपा.

0
9

महेंद्र सोनवणे

यावल – तालुक्यातील सांगवी खुर्द येथे दिनांक 25 जानेवारी रोजी झालेल्या आदिवासी समाजातील एका गरीब कुटुंबातील एका 15 वर्षीय अल्पवयीन भगिनीवर अमानुषपणे सामुहिक अत्याचार करण्यात आला.

या अशा अतिशय निंदनीय घटनेचा आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

आपल्या आदिवासी समाजावर या निंदनीय घटनेने मोठा आघात झाला असून सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनला आणि महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार साहेबांना या घटनेचे निवेदन देऊन सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि अधिकारी पदाधिकारी व समाज बांधवांनी जाहीर निषेध करावा. या अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी कायदेशीर कारवाई साठी सर्व आदिवासी समाज बांधवांनी या नराधमांना समाजाची ताकद दाखवून दिली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात कोणत्याही समाजावर असा प्रकार कोणी करण्याची हिंमत करणार नाही याचा सुद्धा समाजाने विचार केला पाहिजे. तरच आपल्या समाजाला व अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीला न्याय मिळेल.

श्री,किशोर रमेश बाविस्कर, नगरसेवक            सभापती व स्थायी समिती सदस्य .जळगांव मनपा.

Spread the love