सांगवी खुर्द येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचार घटनेचा जाहीर निषेध. आरोपींना कठोर शासन व्हावे गावकर्‍यांची मागणी.

0
33

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सांगवी खुर्द येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा गावातील मंडळीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन, या गुन्ह्यातीत आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे . यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन व एका तरूणाने सामुहीकरीत्या अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली असुन ,या घटनेतील आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले असुन , यातील तिसऱ्या आरोपीस पोलीस कोठडीत टाकण्यात आले आहे . यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी गावातील ग्रामस्थ व विविध ठीकाणाहुन आलेल्या तरूणांनी मागणी केली आहे . यावेळी यावल येथील खरेदी विक्री संघात सांगवी खुर्द गावाचे सरपंच आकाश धनगर, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे , रघुनाथ धनगर, सागर कोळी , जितेन्द्र कोळी, खेमचंद कोळी , नितिन कोळी यांच्यासह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते .

Spread the love