यावल (प्रतिनिधी ) यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन क्रूर नराधमांनी सामूहिकरित्या अत्याचार केल्याची घटना घडली असुन , या घटनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त करीत या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेतील तीन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना दिले आहे . सदरच्या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे जो पर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे म्हणुन आम्ही महिला रस्त्यावर उतरू आंदोलन करू व त्या अत्याचारीत पिडीत अल्पवयीन मुलीला न्याय दिल्या शिवाय राहणार नाहीत असे म्हणत या अत्याचाराच्या संतापजनक घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला त्यासंदर्भात यावल तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीने यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष व्दारका पाटील , काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला ताई इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा गुणवंत नील राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीलिमा दांडे ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष यावल लतिका सावकारे, मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक ममता आमोदकर, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष तथा यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील त्या अत्याचारीत मुलीचे कुटुंब व गावातील तरुण महिला पुरुष ग्रामस्थ मोठया संख्येत यावल पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होते.