जळगाव – संजय राऊत म्हणाले, मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. आमदार आणि खासदार गेले असतील पण मूळ शिवसेना जागेवर आहे. जळगावमधील सर्व पदाधिकारी इथेच आहे. जे आमदार गेले ते परत कधी निवडून येणार नाही.
मग निवडणूक आयोग काय नंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह परत आम्हाला देणार आहे का?
पैशाच्या जोरावर आमदार गेले असतील पण शिवसेना जागेवरच आहे. 2024 ला यांचा पराभव निश्चित आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका घ्या हे सिद्ध होईल. गुलाबराव पाटील यांनी सांगावं मी तिथेच राहून दाखवतो. गुलाबराव पाटील पाटील यांना वाटत असेल की मी त्या हॉटेल मध्ये राहावं तर मी राहून दाखवतो त्यांनी घुसून दाखवावं असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पाचोरा येथील सभेत आमच्यावर बोलाल तर सभेत घुसेल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी घुसून दाखवा असे म्हंटल्यावर गुलाबराव पाटील बॅकफुटवर गेले होते.