संजय राऊतांनी ‘महामोर्चा’ म्हणून शेअर केला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा video?; फडणवीस म्हणाले,”या व्हिडीओची मी”

0
13

मुंबई – महाविकास आघाडीने दोन दिवसापूर्वी मुंबईत ‘महामोर्चा’चे आयोजन केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिंदे गट व भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलल्या आक्षेपार्ह विधानांच्या निधेषार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाचा उल्लेख ‘नॅनो’ मोर्चा असा केला. त्याला उत्तर म्हणून संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. याच व्हिडीओवर आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला होता या व्हिडीओवर आता देवेंद्र फडणवीसांनी सवाल उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या व्हिडीओची मी पडताळणी करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मी काल महाविकास आघाडीच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते, कारण तो मोर्चा ‘नॅनो’च होता. सात संघटना एकत्र करूनही त्यांना २०-२२ हजार लोक जमा करता आले नाही, असा तो मोर्चा होता. पण संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण ‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला.”

दरम्यान, संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, गर्दी दिसत आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला होता.

The post संजय राऊतांनी ‘महामोर्चा’ म्हणून शेअर केला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा video?; फडणवीस म्हणाले,”या व्हिडीओची मी” appeared first on Dainik Prabhat.

 

Spread the love