संत सेना महाराज यांना चोपडा येथे अभिवादन…! 

0
50

हेमकांत गायकवाड

चोपडा : 4 सप्टेंबर 20 21 रोजी चोपडा येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,( श्रीराम नगर) चोपडा, जिल्हा – जलगांव, महाराष्ट्र येथे दि.4/ 9/ 20 21 रोजी चोपडा येथे संत श्री सेना महाराज यांच्या प्रतिमेला जळगाव जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष श्री के .डी. चौधरी, नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री उमाकांत मधुकर निकम यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले .यावेळी श्री के .डी .चौधरी सर यांनी संत सेना महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करून समाज व्यसनमुक्त करण्यासाठी आपल्या अभंगाद्वारे हरी भजना द्वारे जनजागृती केली. त्यांनी दिलेला मार्ग आपण सर्वांनी अंगीकारावा, असे आव्हान श्री के .डी. चौधरी यांनी केले . संताजी जगनाडे महाराज मंदिरात हरिपाठ निमित्त आरती करण्यात आली. यावेळी उमाकांत मधुकर निकम व त्यांच्या धर्मपत्नी सौ कामिनी बाई उमाकांत निकम तसेच मुकेश देविदास चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ मायाताई मुकेश चौधरी यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष मनोहर बन्सीलाल सोनगिरे, तालुका उपाध्यक्ष सोपान बाविस्कर, सुभाष मधुकर सैंदाणे ,आधार नाना आदिनी आरती केली .यावेळी श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने उमाकांत मधुकर निकम यांची नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने व मुकेश देविदास चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांचा सपत्नीक सत्कार सत्कार करण्यात आला .यावेळी संस्थेचे सह सचिव श्री तथा प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी त्यांच्या धर्मपत्नी सौ नम्रता प्रशांत चौधरी ,निशांत चौधरी ,श्रीकांत चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी, विश्वस्त नारायण पंडित चौधरी, पंडित अजय शर्मा , ह भ प ज्ञानेश्वर राजाराम आप्पा नेरकर, विश्वस्त तथा महाराष्ट्र सन्ताजी प्रतिष्ठान चोपडाचे अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी ,मदन मिस्तरी, अशोक भाईदास पाटील ,गौरव पाटील जगदीश मिस्त्री, श्रीमती कलाबाई सुभाष चौधरी, ,दुष्यंत चौधरी बालगोपाळ मंडळी उपस्थित होते. विश्वस्त ,नारायण पंडित चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love