सरळसेवा भरतीच्या बिंदुनामावलीत चोपडा मतदारसंघाचा समावेश करावा. कोळी समाजातर्फे जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

0
47

चोपडा(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे दि.३ जानेवारी २०२२ रोजी शासन निर्णय क्र.बीबीसी २०२०/ प्र.क्र.१५३/१६ ब नुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक,धुळे, नंदुरबार,पालघर,यवतमाळ, रायगड,चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट’क’ व गट’ड’ मधील पदे सरळसेवेने भरती साठी सुधारित बिंदुनामावली विहीत केलेली आहे.विशेष असे की, जळगाव जिह्यातही आदिवासीबहुल लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.तसेच सन २००९ पासुन चोपडा (१०) विधानसभा मतदारसंघ अनु.जमाती (एसटी) साठी राखीव करण्यात आलेला आहे.म्हणुनच जळगांव जिल्ह्यासह चोपडा विधानसभा मतदारसंघाचा सरळसेवा भरतीच्या सुधारित बिंदुनामावलीत समावेश करून जिल्हास्तरीय गट क व गट ड पदांच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य देण्यात यावे,,अशी आग्रही मागणी चोपडा तालुका म.वाल्मिकी कोळी समाज मंडळातर्फे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

याबाबतचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासीमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पालकमंत्री,विरोधीपक्षनेते, मुख्यसचिव, प्रधानसचिव,आदिवासी आयुक्त नाशिक, आदिवासी संचालक पुणे,विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष,अवर सचिव र.अं.खडसे महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी जळगांव,तहसिलदार चोपडा यांचेकडेस पाठविले आहे,असेही जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) यांनी सांगितले आहे.

Spread the love