प्रतिनिधि – जितेंद्र काटे
भुसावळ – दि.१३ डिसेंबर च्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास सपोनी विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठ अधिकारी मा. श्री. महेश्वरी रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल सानप, स फौ संजय देवरे, पोहेका संजीव चौधरी, पोहेका उमेश पाटील ,पोहेका यशवंत तहाकडे, पोहेका किरण पाटील, पोना निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापळा रचून शिताफीने सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित नावे शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान, दोघे राहणार ख्वाजा नगर, सावदा रावेर यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या 76 चरणी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण 37,600/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीताना अटक करण्यात आले आहे तसेच सदर आरोपिताचा सहकारी असलेले एका आरोपीच्या शोधाच्या पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे सावदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.