सावदा पोलीसांची गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या इसमांवर छापा टाकुन कारवाई.

0
47

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – दि.14/03/2025 रोजी सपोनि विशाल पाटील, सावदा पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहिती मिळाली की, वाघोदा बुा, ता.रावेर जि.जळगांव येथे गोवंश जातीच्या जनावरांच्या मासांची विक्री चालु आहे त्या बातमीची खाञी करण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ 1602/ विनोद पाटील, पोहेकॉ 530 किरण पाटील, पोकॉ 2521 बबन तडवी, पोकॉ 3287 मनोज तडवी, चापोकॉ 536 नामदेव कापडे, पोहेकॉ/2472 संजीव चौधरी असे मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार वाघोदा बुा, ता.रावेर जि.जळगांव आएशा मस्जीदच्या बाजुला असलेल्या एका पञी शेडमध्ये छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांच्या मासांची विक्री करणाऱ्या इसम नामे शेख नईम शेख अयुब कुरेशी, वय-47 वर्षे, रा. रसलपुर ता.रावेर जि.जळगांव यास ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांचे ताब्यातुन 12,000/- रु किं चे 60 किलो मांस जप्त करण्यात आले आहे तसेच सदर ठिकाणाहुन एक वजन काटा, मांस कापण्यासाठीचा सुरा, रोख रुपये सुध्दा जप्त करण्यात आले असुन सदर आरोपीविरुध्द सरकारतर्फे फिर्याद देवुन सावदा पोलीस स्टेशन येथे गुनोक्रं 60/2025 महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) (क), 9, 9 (अ), भारतीय न्याय सहीता 2023 ते कलम 325, 271, 3 (5) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 105 प्रमाणे दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ/1602 विनोद पाटील हे करीत आहे.

सदर प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की, ज्या ज्या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावराची मांस विक्री होत असेल त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहीती दयावी सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणी माहिती देणारांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.

Spread the love