प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ – मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो यांचे आदेशाने सावदा पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी हे दर शुक्रवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत पोलीस स्टेशनचा परिसर श्रमदान करून स्वच्छ करीत आहेत. तसेच सावदा पोलीस स्टेशन च्या वतीने सपोनि विशाल पाटील यांनी सावदा शहर वासियाना आपला परिसर स्वच्छ ठेवणे बाबत आवाहन केले आहे.