सावदा शहर खुनाने हादरले : अज्ञातांकडून सालदाराचा निर्घूण खून

0
32

सावदा : शेतात सालदार म्हणून काम करणार्‍या प्रौढाचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर सावदा शहरात खळबळ उडाली आहे. सावदा ते कोचूर रोडवर एका शेतातील घरात सालदाराचा मृतदेह आढळला आहे. शोभाराम रिचू बारेला (45) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खुनाने सावद्यात खळबळ

शोभाराम बारेला हा सालदार म्हणून कामाला होता व तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. . ही घटना कोचूर रोडवर असलेल्या बेंडाळे यांच्या शेतात घडली.शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोभाराम बारेला यांचा मृतदेह आढळल्यानंतर सावदा पोलिसांना सूचित करण्यात आले. सावदा सहा.निरीक्षक जालिंदर पळे व सहकार्‍यांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून नातेवाईकांकडून पोलीस माहिती जाणून घेत आहेत.

Spread the love