सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण सोहळा

0
17

जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या पत्नी व रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सौ. सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त चंदू आण्णा नगर, कचरा फॅक्टरी रोड, नवीन द्वारका नगर, आव्हाने शिवार येथे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

या सोहळ्याचे आयोजन सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनच्या संचालिका सौ. लक्ष्मी सम्राट कुमावत, एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका सौ. स्नेहा सोनवणे, तसेच शिवमुद्रा महिला मंडळ आणि मित्र मंडळाचे आकाश भाऊ भालेराव यांच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण सोहळ्याच्या माध्यमातून सौ. सीमाताई आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास प्रल्हाद सोनवणे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष रत्नाताई बागुल सचिव कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन सौ. गीता ताई शुक्ला (संचालिका, चेतना व्यसनमुक्ती केंद्र योगिता ताई शुक्ल उपाध्यक्षा कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन सौ. संगीता ताई सोनवणे, समाजसेवक श्री. गणेशभाऊ बाविस्कर, श्री. विवेक सैंदाने (जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव), सौ. भाग्यश्री भालेराव (अध्यक्ष, शिवमुद्रा महिला मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती होती तर श्री. आकाश भालेराव, सौ. रत्नाताई बाविस्कर (अध्यक्ष, शिवमुद्रा नवदुर्गा महिला मंडळ), सौ. संगीता सपकाळे, श्री. भैय्या भाऊ, यश सम्राट बेलदार, गणेश कुंभार, मल्हार पाटील कार्तिक परदेशी हितेश पाटील बाळासाहेब पाटील निखिल नेरकर वरूणराज मैराळे सार्थक सिध्द सेवा फाउंडेशन चे पदाधिकारी तसेच शिवमुद्रा मित्र मंडळाचे पदाधिकारी यांच्या सह या भागातील समाज बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला वृक्षारोपण सोहळा उत्साहपूर्ण आणि सामाजिक भान जपणारा ठरला.

Spread the love