वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिलीप राव यांची निवड 

0
43

भोकर – आगामी काळात होणाऱ्या निवणुका तोंडावर आल्या असताना पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या स्वाक्षरीने दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीची भोकर तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यामध्ये भोकर तालुकाध्यक्ष पदी दिलीप केरबाजी राव यांची निवड करण्यात आली.

दरम्यान मागील निवड प्रक्रियेत मावळते तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे यांनी तालुक्यात केलेल्या उत्कृष्ठ कार्याची पक्षश्रेष्ठीकडून दखल घेऊन मागील काळात दोन वेळा सुनिल कांबळे यांची तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या आदेशावरून भोकर तालुका जिल्हा नांदेड उत्तरचा विस्तार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी भोकर येथील शासकिय विश्रामगृहात बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंभिरे पालमकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये भोकर तालुका नूतन कार्यकारणी निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी वंचीतच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या स्वाक्षरीने भोकर तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली यामध्ये भोकर तालुका अध्यक्ष पदी दिलीप केरबाजी राव यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेली उर्वरित कार्यकरणी पुढील प्रमाणे आहे.

तालुका महासचिव – व्यंकट वाडेकर, उपाध्यक्ष – ग्यानु चव्हाण, साईनाथ हामंद, आनंद गोलेवाड, आनंदराव एडके, शिवाजी जंपलवाड, माणिक जाधव, सत्यपाल कदम, सहसचिव – लखन देवकर, हर्षवर्धन धोतरे, राजेश्वर बोराटे, प्रसिद्धी प्रमुख – दिलीप आंपलवाड, शिवाजी सूर्यवंशी, सुभाष तेले, सल्लागार – सटवाजी गायकवाड, सदस्य – अक्षय खंदाडे, पुंडलिक कांबळे, किरण ढगारे, प्रवीण चंदेवाड, रवी दुधारे, गोविंद गोलेवाड, शेख आशमाख, विठ्ठल चव्हाण, राहुल देवके, मेहमूद शेख आदी कार्यकर्त्यांची विविध पदांवर निवड करून वंचित बहुजन आघाडीची तालुक्याची जबाबदारी देण्यात आली. सदरील नूतन कार्यकारणीचासर्व स्तरातून अभिनंदन करून पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दिलीप राव वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझी वंचित बहुजन आघाडी या राष्ट्रीय पक्षाच्या भोकर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यामुळे मी पक्षाशी प्रमाणीक व एकनिष्ठ राहून तालुक्यातील वंचित समाजाशी प्रामाणिक राहून वंचित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाचा उपयोग करेन. असे तालुकाध्यक्ष दिलीप राव म्हणाले.

Spread the love