तळोदा-: दिनांक 15 नोव्हेंबर रोजी तळोदा तालुक्यातील तलावडी गावामध्ये सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांचे पुस्तक देण्यात आले. जिल्हा परिषद शाळा तलावडी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वसावे सर श्री अमित कलाल सर व गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वसावे सर यांनी केले
या कार्यक्रमात सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांची माहिती दिली यावेळेस ते बोलताना म्हणाले की, मनुष्य हा किती जगला यापेक्षा कसा जगला हे आपण भगवान बिरसा मुंडा कडून शिकले पाहिजे. भगवान बिरसा मुंडा यांना वयाच्या 25 जगले होता. भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिवशी जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो व तो आपण येथे साजरा करत आहोत असे म्हणाले. यावेळी जयसिंग वसावे,जयराम ठाकरे,सुरपसिंग ठाकरे व गावातले ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर पाटील कार्याध्यक्ष संतोष चौधरी अनिल नाईक नकुल ठाकरे अतुल पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या आभार श्री अमित कलाल सर यांनी केले