सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न

0
47

तळोदा -सेवाभावे प्रतिष्ठान तर्फे तळोदा येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळेस व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष स्थानी श्री.जयवंत सुनील चौधरी सर प्राथमिक शिक्षक बेडापाडा,प्रमुख अतिथी श्री.अमित जीवन कलाल सर माध्यमिक शिक्षक तलावडी, चि.उमेश भैय्या विजय सोनवणे सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष हे मंचावर उपस्थित होते.

प्रथम भारत माता पूजन मान्यवरांनी केली.या कार्यक्रमाची प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या सोनवणे यांनी केले यावेळेस ते म्हणाले की, गुरु हे आदर्श आहे त्यांच्या सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून सेवाभावे प्रतिष्ठाने शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रम घडवून आणला असं त्यांनी म्हटले. यानंतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला श्री.जयवंत चौधरी सरांच्या सत्कार चि.उमेश भैय्या सोनवणे अध्यक्ष सेवाभावे प्रतिष्ठान यांनी केले. श्री.अमित कलाल सरांच्या सत्कार श्री.संतोष चौधरी कार्याध्यक्ष सेवाभावे प्रतिष्ठान यांनी केला. श्री.ललित पाटील सर यांच्या सत्कार श्री.अतुल भिमसिंग पाटील संचालक सेवाभावे प्रतिष्ठान यांनी केला. श्री सुरसिंग पाडवी सर यांच्या सत्कार चि.पवन सोनवणे यांनी केले. श्री पंडित राव वळवी सर यांच्या सत्कार श्री.प्रवीण गजानन पाटील धानोरा यांनी केले.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जयवंत चौधरी सर यांनी असे म्हटले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोना या महामारी मुळे विद्यार्थी व शिक्षकांचा संभाषण हे फक्त ऑनलाईन होत होते. यामुळे शिक्षकाला ज्याप्रकारे विद्यार्थ्यांवर लक्ष व अभ्यास करून घेणे हे थोडे अवघड होते. या सेवाभावे प्रतिष्ठाने आमच्या असा सत्कार घडवून आणल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे असे ते म्हणाले.यावेळेस शिक्षकांच्या वतीने श्री ललित पवन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळेस आभार हे सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री.संतोष जगत चौधरी यांनी आभार मानले.

Spread the love