शहरात घरफोडी करणारे गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

0
37

जळगाव-: शहरातील होणा-या घरफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे. आरोपीताचा शोध घेणे बाबत मा. पोलीस अधीक्षक सो. श्री एम. राज कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार मा. पोलीस निरीक्षक किसन नज़नपाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली की जिल्हापेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरन ६०४/२०२२ भा.द.वि कलम ४५७,३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता, सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे खालील गोडावून चे कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेले असुन ती चोरी त्याचा नातेवाईक जावाई तुषार विजय जाधव (पाटील) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे कळवील्या वरून पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील 1. अविनाश देवरे प्रीतम पाटील, दिपक शिंदे, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था. गु.शा, अशांना, आदेश दिल्याने सापळा रचुन वरील आरोपीतास ताब्यात घेवुन त्याचे चार मित्र साथीदार यांना निषपण्ण करून त्यापैकी आरोपी १) तुषार विजय जाधव(पाटील) वय २५ रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव व त्याचा साथीदार २) सचिन कैलास चव्हाण वय २२ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव अशांना गुन्हयाकामी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस करून गुन्हा उघडकीस आणला आहे..

Spread the love