शाळेची घंटा आता पुन्हा वाजणार, या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार

0
13

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा वर्षभरापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या भागांमध्ये आता कमी झाली तिथे नुकतेच 8 ते 12 वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील शाळांसंदर्भात मोठी अपडेट येत आहे. राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या भागात सध्या ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ५ ते ८ चे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. तर शहरांमध्ये 8 ते 12 वीचे वर्ष सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू होणार आहे.  विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Spread the love