शरद पवार 20 पासून जळगाव जिल्ह्यात; चोपडा, रावेरला जाहीर सभा

0
43

जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत.

त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ते जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी (ता. २०) दिंडोरी (जि. नाशिक) येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत.

त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील. रविवारी (ता. २१) ते रावेर येथे सकाळी अकराला सभा घेतील. त्यानंतर ते दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.

Spread the love