शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकाळी येथे माता पिता पालक सभा संपन्न!

0
47

दिपक नेवे

 

यावल -दि. 20 ऑगस्ट 2021 शुक्रवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकाळी येथे माता पिता पालक सभा संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी सदर सभेचे पदसिद्ध अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी.पी. बोरसे, पर्यवेक्षक श्री. एस. जे. पवार, शिक्षक प्रतिनिधी श्री. बी. ई. महाजन, श्री. जी. एल. चौधरी, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. किरणकुमार चौधरी हे उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. एस. जे. पवार यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर माता – पिता पालक सभेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठीत करण्यात आली.

अध्यक्ष – श्री जी पी बोरसे

उपाध्यक्ष – किशोर दगडू राजपूत (पिता)

उपाध्यक्ष – नीलिमाताई नेवे(माता)

सचिव -श्री एम ए महाजन

सहसचिव – प्रतिभाताई महाजन.

याप्रमाणे निवड करण्यात आली.

यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक श्री बी ई महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. पी. बोरसे यांनी ऑनलाइन क्लास, ऑफलाइन शिक्षण, पालकभेटी, वाचनाचा सराव यावर सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाय. बी. सपकाळे यांनी केले तर आभार श्री डी पी माळी यांनी मानले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love