प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – पोलाड ऍग्रो मिनीरल यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली केळी, धरती कृषी संवर्धन निर्यात कंपनीमार्फत पाठवली.
शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे त्यांची केळी बुधवारी कापणी होत थेट इराण येथे निर्यात केली जात आहे. उच्च दर्जाची केळी व निर्यातक्षम केळी उत्पादन करीता शेतकरी राणे यांना पोलाड ऍग्रो मिनिरल कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले व धरती कृषी संवर्धन निर्यात कंपनीमार्फत पाठवण्यात आली आहे. जी नाईन व्हरायटी ची केळी असुन २० टन केळी ते निर्यात करीत बाजार भावा पेक्षा ५०० रूपये अधिकचा भाव देखील शेतकऱ्यास मिळाला आहे.
केळीवर एकीकडे अनेक संकटे ओढवतात आणि शेतकरी हवालदिल होतो मात्र, काही शेतकरी असे आहेत की जे उच्च दर्जाची केळी पिकवतात आणि त्या केळी ला विदेशातून मागणी होत असते. अशा निर्यातक्षम केळीचा चांगला भाव देखील मिळतो तेव्हा अशा प्रकारे उत्पादन मिळवण्या करीता शेतकऱ्यांनी देखील पारंपारीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. तेव्हा पारंपारीक पध्दतीच्या पलीकेड जावुन शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे यांनी आपल्या शेतात पोलाड ऍग्रो मिनरल कोल्हापूर या कंपनीचे प्रतिनिधी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात जी – नाईन व्हरायटीचे टिशू चे रोप लागवड केली व पाच बाय पाच गाला तयार करून टिशुची लागवड केली व तिला कंम्पनीच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनात केळीला वेळो वेळी खते, फवारणी व योग्य पाण्याचे नियोजन केले व आता केळीचे उत्पादन तयार झाले व नुकतेच त्यांची केळी ही निर्यातक्षम आहे किंवा नाही ही तपासणी धरती कृषी संवर्धन निर्यात कंपनी कोल्हापूर यांच्या प्रतिनिधीने केली आणी बुधवार पासुन केळी कंम्पनीच्या तंत्रशुध्द पध्दतीने कापणी करून तिला निर्यातीच्या दृष्टीने योग्य प्रोसेस करीत पॅकींग करण्यात आली आणी २० टन केळी इराण देशात निर्यात केली जात आहे.
बाजार भावापेक्षा ५०० रूपये जास्त भाव.
सद्या केळीला एक हजाराचा बोर्ड भाव असुन निर्यातक्षम केळीला १ हजार ५०० चा भाव मिळाला आहे. केळी उत्पादन घेत असतांना पारंपारीक पध्दतीच्या पलीकडे जावुन केळी पिकाची लागवड पासुन ते उत्पादन येई पर्यंत योग्य निगा ठेवल्यास आपण निर्यातक्षम केळी उत्पादन घेवु शेकतो असे प्रसंगी शेतकरी किशोर राणे यांनी सांगीतले.
४ लाख केळी खोडावर लक्ष.
तालुक्यात पोलाड ॲग्रो मिनरल कोल्हापूर यांचे प्रतिनिधी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून न्हावी येथील शेतकरी निलेश वाघुळदे, सातोद येथील बाळू अभिमन पाटील, पिळोदा येथील दीपक पाटील, साकळी येथील सुबोध मुजुमदार सह आदी शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या तब्बल ४ लाख केळी खोडव्दारे निर्यातक्षम केळी उत्पादन मिळवण्या करीता परिश्रम घेत आहे.
कापणीची पध्दत पिलबाग,शिल्लक खोड करीता उपयुक्त.
केळी कापणी करतांना केळीचे झाड कापले जात नाही परिणामी केळीच्या उभ्याझाडाला ज्या मात्रेत खत पुरवठा व मिनरल दिले असतात ते खोडा जवळील पिल ला मिळतात व पिल बाग उत्पन्न चांगले येते तर उभ्या असलेल्या झाडा मुळे शेताची धुप कमी होत शेतात ओलावा राहतो आणी शिल्लक खोडाचे उत्पादन चांगले येते.