हेमकांत गायकवाड
चोपडा -शेतकरी अस्मानी संकटाने आधीच मारला गेलेला असल्याने शासनाच्या काही चुकीच्या निर्णयाने त्याचे जीवन अजून कठीण झाले आहे. त्याच्या शेतातील रस्ता ना सरकार बनवत ना त्याला स्वतःला दुरुस्त करू देनेसाठी मुरूम मिळू देत नाही ,ना ही शेतात घर बांधण्यासाठी रेती मिळत . बाजारात शेतमाल न्यायचा तर सारे रस्ते खराब व शेतातून शेतमाल घरात आणायचा तर त्या रस्त्यांची अवस्था तर किती भयानक आहे हे विचारायलाच नको.
या आधी हे रस्ते शेतकरी जवळच्या नाल्यातील रेती(ग्रव्हल) असो की सरकारी खदानीतून मुरूम तोआणून रस्ता दुरुस्त करायचे व शेतमाल शेतातून घरी आणायचे,आता सरकार धाडी टाकून त्याला ते ही करू देणार नसेल तर शेतरस्ते दुरुस्त होतील कसे?
_आधी शेतकऱ्यांना घर दुरुस्तीसाठी असो की शेतातील घर बांधकामाला ,शेतकरी रीतसर गौण खनिजाचे परमिट काढून चलन भरून ते मिळायचे त्यामुळे अडचण येत नव्हती.आता रेती चे टेंडर सुरू झालेत व सुरू झाली सर्वसामान्यांची लूट आणि माफिया राज त्यामुळे कुणी सर्वसामान्य माणूस घर बांधताना किंवा दुरुस्ती करताना देखील हैराण होतो.आता तर त्यात गौण खनिज सरकारी खदान मधून बंद व खाजगी असेल तर त्याची परवानगी आणि इतर बाबी करत बसला तर शेतकरी जगेल कसा._
_राज्याचे महसूल मंत्री मा बाळासाहेब थोरात साहेब हे सज्जन गृहस्थ आहेत त्यांना वरील बाब लक्षात यावी यासाठी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी नाना पाटील यांनी email व्दारे केली …