प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव वांजोळा, गोंभी, शिवारात कृषी पंपासाठी असलेली विज वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत त्यामुळे शेतकरी थेट सुनसगाव येथील विज वितरण कंपनी च्या कार्यालयात पोहचले व आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी कायमस्वरुपी अभियंता नसल्याने समस्या कोण सोडविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी रात्री शेतात जातात मात्र सतत विज पुरवठा खंडित होतो त्यामुळे विजपुरवठा नियमीत करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी सुरेश नारखेडे, युवराज पाटील, नंदलाल भोळे,सुधाकर पाटील, एस आर पाटील, धनराज कोळी (गोंभी), माधव सपकाळे, जितेंद्र पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.