शेतकऱ्यांचे खरीप पीक विम्याचे पैसे तर द्या; शेतकरी संघटना झिजवतायेत कार्यालयांच्या पायऱ्या

0
40

हेमकांत गायकवाड

चोपडा : दरवर्षीप्रमाणे सातत्याने आर्थिक नुकसान होत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे. या स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व त्यांच्या पिकाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योग्य वेळी व नुकसानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, योजनेचा हेतू साध्य होताना दिसत नाही. हक्काची पीक विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन विभाग व विमा कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असून, अजूनही जिल्ह्यातील हजारो कापूस, तूर, तीळ मूग उडीद मका उत्पादकांना खरीप 2020-21च्या पीक विम्याच्या रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जळगाव : वर्षभरापासून शेतकरी संघटना कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

दुसऱ्या वर्षातील खरीप पेरणीसुद्धा आटोपली. मात्र अजूनही कापूस, तूर, तीळ मूग उडीद मका पिकाच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसून, कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाने आता तरी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील रघुनाथ दादा शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे वर्षोगणती शेतकरी नुकसान सोसत असून, प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशाच येत आहे. सातत्याने आर्थिक नुकसान होत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे. या स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व त्यांच्या पिकाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योग्य वेळी व नुकसानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, योजनेचा हेतू साध्य होताना दिसत नाही. हक्काची पीक विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन विभाग व विमा कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. गेल्यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे 2020-21 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधिच जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता आणि आता कोरोना चा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून, शेतमाल विक्री सुद्धा करणे कठीण झाल्याने, आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्‍यक होते मात्र अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मधील कापूस, तूर, तीळ मूग उडीद उत्पादकांना विम्याच्या रकमेसाठी , जिल्हा प्रशासन व विमा कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

कृषी मंत्र्यांनी व जळगाव जिल्ह्यातील पालक मंत्री मा.गुलाबराव पाटील यांनी सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे कापसाची पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी मात्र अजूनपर्यंत जळगाव जिल्ह्यातील कापूस, तूर, तीळ मूग उडीद उत्पादकांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही.

तरी त्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जळगावच्या भारतीय एक्सा विमा कंपनीच्या थेट ऑफिस मध्ये जाऊन संवाद साधून त्यांना जाब विचाराना केली शेतकऱ्यांचे पैसे अजुन किती दिवस लागतील व शेतकऱ्यांनी फक्त विमा भरायचा का?

त्यांना लाभ कधी मिळेल ज्या विम्याचे पैसे ज्यावर्षी शेतकरी भरतो त्याचा लाभ जर दोन वर्षांनी मिळत असेल तर शेतकऱ्यांनी विमा भरावा की नाही आहे एक प्रश्नचिन्ह आहे

त्यासंदर्भात आज जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भारतीय एक्सा कंपनीच्या चा ऑफिसला जाऊन त्यांचे प्रतिनिधींना भेटलो व त्यांना खडे बोल सुनावले की येणाऱ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना विमा चे पैसे नाही मिळाले तर शेतकरी संघटना व शेतकरी आपल्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्या वेळी तेथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप पाटील खानदेश प्रमुख किरण गुर्जरउपजिल्हाध्यक्ष संजय महाजन जिल्हाध्यक्ष सचिन शिंपी, चोपडा ता अ देवेंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष चोपडा 

संजय पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख, विनोद पाटील नामदेव महाजन अजित पाटील,विनोद धनगर,अॅड‌. अंबादास पाटील,प्रदिप पाटील,राहूल पाटील,वसंत पाटील,वैभव पाटील,प्रविण नेवे ,विलास माळी ,नरेंद्र पाटील,अड राहूल पाटील चोपडा प्रेमचंद धनगर,अखिलेश पाटील खुशाल सोनवणे मंगेश राजपूत नंदलाल पाटील जीवन चौधरी सय्यद देशमुख सुनील पाटील जारगाव संजय पाटील विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love