रेशनकार्ड वर १२ अंकी नंबरसाठी शिबीराचे आयोजन!

0
43

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रेशनकार्ड वर १२ अंकी नंबरसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ व ३० डिसेंबर अशा दोन दिवस तहसीलदार कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे विनाकारण कोणत्याही प्रकारचा खर्च या ठिकाणी लागणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love